Vidhansabha Election 2024 ; A Proven Track Record in Maharashtra Assembly Elections
- The Branding Agency

- Oct 30
- 3 min read
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील The Branding Agency ची कामगिरी
गेल्या अनेक वर्षांत The Branding Agency ला महाराष्ट्रात विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक रणनीती, डिजिटल कॅम्पेनिंग आणि सोशल मीडिया व्यवस्थापनाची जबाबदारी मिळाली. आव्हानात्मक परिस्थितीतही योग्य रणनीती, प्रभावी Narrative Building आणि डिजिटल साधनांचा अचूक वापर करून आम्ही अनेक ठिकाणी परिणामकारक निवडणूक मोहिमा राबवल्या.

या सर्व कामांचा आढावा म्हणजेच आमची वास्तविक Election Success Story.
१) श्री. चंद्रकांतदादा पाटील (कोथरूड विधानसभा मतदारसंघ – 2019 आणि 2024)

2019 – कठीण परिस्थितीतील निर्णायक मोहीम
2019 साली कोथरूड विधानसभा मतदारसंघात वरिष्ठ नेते आणि तत्कालीन भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली.
ते मूळचे कोल्हापूरचे असल्याने पुण्यातील कोथरूड सारख्या पूर्णपणे नवीन मतदारसंघात निवडणूक लढविण्याचा निर्णय सर्वांसाठीच आश्चर्यकारक होता. त्यांची उमेदवारी अगदी शेवटच्या टप्प्यात जाहीर झाल्यामुळे:
नवीन मतदारसंघ
नवीन कार्यकर्ते
नवीन भूगोल
कमी कालावधी
या सर्व परिस्थितीत प्रचारयंत्रणा उभी करणे अत्यंत आव्हानात्मक होते.
याच कठीण परिस्थितीत त्यांच्या मुख्य यंत्रणेकडून The Branding Agency ला सोशल मीडिया मार्केटिंग व Narrative Building ची जबाबदारी देण्यात आली.
अत्यंत मर्यादित वेळेत आम्ही:
कोथरूड मतदारसंघाचा डिजिटल मॅपिंग केला
लोकांच्या अपेक्षा आणि स्थानिक मुद्द्यांवर आधारित narrative तयार केला
अल्पावधीत एक मजबूत सोशल मीडिया नेटवर्क उभे केले
प्रत्येक कंटेंटला जास्तीत जास्त reach दिली
त्याचा परिणाम -
चंद्रकांतदादा पाटील यांनी 2019 मध्ये कमी वेळेत प्रचार करूनही भक्कम मतांनी विजय मिळवला.
या विजयात आम्हाला योगदान देता आले याचा आम्हाला अभिमान वाटतो.
2024 – विक्रमी विजय
2024 लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे राज्यभर "बदलाचे वारे" वाहत असल्याची चर्चा होती.
या आव्हानात्मक पार्श्वभूमीवर 5 जून 2024 ते 20 नोव्हेंबर 2024 दरम्यान The Branding Agency ने कोथरूडमध्ये:
सोशल मीडिया कॅम्पेन
लोकांपर्यंत कार्य पोहोचवणे
डिजिटल Perception Management
जास्तीत जास्त Positive Visibility
यावर काम केले.
या काळात:
चंद्रकांतदादा पाटील यांच्या 5 वर्षांच्या कामगिरीचे प्रभावी डिजिटल Presentation केले
विविध विकासकामे, लोकाभिमुख निर्णय आणि जनसिंवधी कार्यक्रमांची प्रबळ प्रसिद्धी केली
मोठ्या प्रमाणात organic engagement निर्माण केले
श्री.चंद्रकांतदादा पाटील यांनी 2024 मध्ये विक्रमी मतांनी विजय मिळवला.
2019 आणि 2024 — दोन्ही विजयात आम्हाला योगदान देता आले हा आमच्यासाठी गौरवाचा क्षण आहे.
२) नाना पटोले (साकोली विधानसभा – 2024)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे तत्कालीन अध्यक्ष नाना पटोले यांच्या 2024 च्या साकोली विधानसभा निवडणुकीत:
सोशल मीडिया Engagement वाढवणे
जनतेशी डिजिटल संवाद वाढवणे
लोकांपर्यंत कामे पोहोचवणे
या उद्दिष्टांसाठी आम्हाला जबाबदारी देण्यात आली.
अत्यंत अल्पावधीत:
नाना पटोले यांच्या सोशल मीडिया Engagement मध्ये 95% वाढ
वाढीव organic reach
मजबूत digital presence
आमच्या स्ट्रॅटेजीचा परिणाम म्हणून नाना पटोले यांनी निवडणुकीत विजय मिळाला.
या विजयात आमचे योगदान असल्याचा आम्हाला अभिमान आहे.
३) विश्वजित कदम (पलूस–कडेगाव विधानसभा – 2024)

सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेते आ. विश्वजित कदम यांच्या डिजिटल कॅम्पेनची काही जबाबदारी The Branding Agency कडे देण्यात आली.
आमचे मुख्य उद्दिष्ट:
Positive Perception निर्माण करणे
त्यांच्या कामांना व्यापक प्रसिद्धी देणे
सोशल मीडियातील Engagement वाढवणे
अल्पावधीतच:
120% Engagement वाढ
अनेक व्हिडिओ, reels अत्यंत उच्च प्रमाणात organic reach
सोशल मीडिया वर प्रभावी जनसंपर्क
यामुळे विश्वजित कदम यांच्या प्रतिमेत सकारात्मक वाढ झाली आणि 2024 मध्ये त्यांना विजय मिळाला.
४) संदीप क्षीरसागर (बीड विधानसभा – 2019 आणि 2024)

2016 पासून The Branding Agency संदीप क्षीरसागर यांच्या सर्व निवडणूक मोहिमांचा डिजिटल भाग सांभाळत आहे:
2016 बीड नगरपरिषद
2017 जिल्हा परिषद व पंचायत समिती
2019 विधानसभा
2024 विधानसभा
2019 – प्रतिकूल परिस्थितीतील यश
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 2019 मध्ये संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी दिल्यानंतर प्रतिकूल परिस्थिती असूनही आम्ही:
प्रत्येक पोस्टला जास्तीत जास्त reach दिली
लोकांपुढे त्यांचा कामाचा इतिहास प्रभावीपणे मांडला
डिजिटल level वर मजबूत वातावरण तयार केले
परिणाम संदीप क्षीरसागर यांना विजय मिळाला.
2024 – महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार
2024 मध्ये देखील आम्ही:
प्रभावी डिजिटल रणनीती
लोकांशी संपर्क वाढवणारे कंटेंट
वेळोवेळी मुद्देसूद updates
यावर काम केले.
या निवडणुकीतही संदीप क्षीरसागर यांना यश मिळाले दोन्ही विजयात डिजिटल योगदान देता आले हे आमचे भाग्य समजतो.
५) अर्जुन खोतकर (जालना विधानसभा – 2014)

2014 मध्ये शिवसेनेतर्फे अर्जुन खोतकर यांच्या संपूर्ण विधानसभा कॅम्पेनची सोशल मीडिया रणनीती The Branding Agency ने तयार केली.
पूर्णपणे डिजिटलरीत्या व्यवस्थित कॅम्पेन
योग्य Narrative Building
मजबूत डिजिटल reach
यामुळे अर्जुन खोतकर यांनी विजय मिळवला.
या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे.
६) जयदत्त क्षीरसागर (बीड विधानसभा – 2014)

2014 मध्ये मोदी लाट असतानाही बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी विजय मिळवला.
या निवडणुकीत:
जयदत्त क्षीरसागर यांच्या संपूर्ण सोशल मीडिया कॅम्पेनची जबाबदारी आमच्याकडे होती
Live Updates देणारी एकमेव agency म्हणून आम्हाला ओळख मिळाली
Real-time आधारित प्रचारामुळे मतदारांपर्यंत थेट संवाद साधता आला
कठीण परिस्थितीत मिळवलेला हा विजय आमच्यासाठीही अभिमानास्पद ठरला.
निष्कर्ष – The Branding Agency ची यशोगाथा
महाराष्ट्रातील अनेक विधानसभा मतदारसंघात प्रभावी डिजिटल कॅम्पेन
आव्हानात्मक परिस्थितीतील प्रभावी रणनीती
प्रचंड Engagement वाढ
लोकांपर्यंत नेत्यांचे कार्य पोहोचवणे
अल्पावधीत मोठा Digital Impact
हे सर्व म्हणजे The Branding Agency चे खरे यश.



Comments